Thursday, February 6, 2025

DeepSeek काय आहे ? ज्यामुळे AI इंडस्ट्री हादरवली

Deepseek AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांनी वर्चस्व राखण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक सुरू केली असतानाच, चीनच्या डीपसीक या AI स्टार्टअपने कमीत कमी खर्चात नवे चॅटबॉट विकसित करून अमेरिकन कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

डीपसीक (DeepSeek) म्हणजे काय?

डीपसीक ही चीनमधील एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी आहे, जी AI मॉडेल्स आणि चॅटबॉट्स विकसित करते. अलीकडेच DeepSeek-V3 नावाचे नवीन AI मॉडेल त्यांनी लाँच केले असून, ते ChatGPT आणि इतर AI चॅटबॉट्ससाठी पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

लिआंग वेनफेंग हे डीपसीकचे संस्थापक आहेत. त्यांनी डीपसीकला भांडवली मदत करण्यासाठी हेज या फंडाचीही स्थापना केली. त्यातून आलेल्या निधीतून डीपसीकचा अर्धा खर्च ते भागवू शकले.

DeepSeek-V3 मॉडेल ओपन-सोर्स तत्त्वावर आधारित नवीन AI मॉडेल, जे ChatGPT सारखेच कार्य करते. अमेरिकन AI कंपन्या जिथे अब्जावधी डॉलर्स खर्च करतात, तिथे डीपसीकने तुलनेने खूपच कमी खर्चात आपले मॉडेल तयार केले आहे. डीपसीकच्या यशामुळे NVIDIA, Microsoft, Meta यांसारख्या मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

राज्यात लवकरच दहा हजार जागांसाठी पोलिस भरती

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles