तळेगाव : परराज्यातील सायकलपटूनंचे पुणे येथे स्वागत करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सायकलपटू दत्ता घुले म्हणाले, दिनांक 22 डिसेंबर 2021 मित्राच्या कामा निमित्त कार मधून तळेगाव हायवे वरुन जात आसताना अचानक 3 सायकलपटू सायकल प्रवास करताना दिसले. सायकलच्या मागे मोठी साहित्य बाॅग आणि केरळ ते काश्मिर फलक लावलेला दिसला. शेवटी न राहूल्याने त्यांना मी थांबवल. शेवटी मी ही एक सायकलपटूच आहे. विषेश म्हणजे त्यांना फक्त इंग्लीश व कनड, तमिळ भाषा येत होती.
त्यांची विचारणा केली असता त्यांनी मुंबई – केरळ – काश्मिर असा तब्बल 2145 कि.मी.चा प्रवास पुर्ण करायचा आहे असे सांगितले. हे 3 सायकलपटू काल रात्री मुंबई वरुन पुढे निघाले आहेत. त्यांचे पुण्यामध्ये स्वागत करत त्यांना पुढील प्रवासात येणाऱ्या शहरांची व रस्त्यांची माहिती घुले यांनी दिली. तसेच पुढील प्रवास सुखकर व यशस्वी होवो या शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या गोष्टीमुळे काही वेळेसाठी या परराज्यातील सायकलपटूंचा थकवा नाहीसा होऊन त्यांच्या चेहर्यावर आनंदाचे हासू आले.
मित्रानों विनंती, आपणही प्रवासात जात आसताना प्रवासात दिसणाऱ्या सायकल पटूंचे मनोबल व ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देत जा हेच आम्हा सायकलपटूंचे खरे बक्षीस असते.