Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हाचांदवड येथे जन आशीर्वाद यात्रेत भारती पवार यांचे जल्लोषात स्वागत

चांदवड येथे जन आशीर्वाद यात्रेत भारती पवार यांचे जल्लोषात स्वागत

spot_imgspot_imgspot_imgspot_img

चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार या पहिल्यांदाच मंत्री झाल्यामुळे व नाशिक जिल्ह्यात पहिल्या आरोग्य व महिला बालकल्याण राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे चांदवड तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी २५० कि.लो. वजनाचा व २४ फूट लांबीचा फुलांचा हार क्रेनच्या सहाय्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या सौजन्याने देण्यात आला.

भारती पवार यांनी चांदवड येथील मार्केट कमिटी सेल हॉल या ठिकाणी झालेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सांगितले की, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना या तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी व नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्ही दिलेल्या आशीर्वादा प्रमाणे मी सदैव कटिबद्ध राहील जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करेल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार कोणीही योजने पासून वंचित राहणार नाही. तसेच नाशिक जिल्हा हा शेतीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी शेतीमालाला योग्य भाव व लागणारी साधन सामुग्री खते यासाठी देखील भविष्यात कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही व भाव मिळेल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. तसेच कांदा, टोमॅटो, द्राक्ष ही मूळ पिके असून यांच्या साठी देखील हमीभाव कसा मिळेल किंवा यातून मिळणारा मोबदला हा अधिकाअधिक कसा मिळेल याचा प्रयत्न मी यापुढे केंद्राच्या माध्यमातून करणार असल्याचे केंद्रीय मंत्री पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री डॉ.पवार यांनी पत्रकार परिषद घेत लसीकरणाबद्दल देखील माहिती दिली, तसेच, भविष्यकाळात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर तिच्याबरोबर मुकाबला करण्यासाठी शासन दरबारी वेगवेगळे नियोजन करून रुग्णवाहिका, शासकीय रुग्णालय, ऑक्सिजन बेड, मानधन तत्त्वावर काम करणारा कर्मचारी, औषधे व त्या अंतर्गत लागणारी साधन सामग्री तसेच इतर आवश्यक त्या साधन सामुग्रीसाठी निधी मंजूर करून तयारी करत आहोत जेणेकरून भविष्यकाळात आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण सर्व सज्ज असू अशी वेळ येऊ नये परंतु आलीच तर आम्ही जनतेला यापासून त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी ही तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, युवा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, भाजपा जिल्हा परिषद गट नेते आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश अध्यक्ष अनुसूचित मोर्चा प्रा.अशोक उईके, प्रदेश संपर्कप्रमुख अनुसूचित जमाती मोर्चा किशोर काळकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय