Tuesday, September 17, 2024
Homeग्रामीणआदिवासी कार्यालयाच्या उपाययोजना आदिवासी गावागावात पोहचवू...

आदिवासी कार्यालयाच्या उपाययोजना आदिवासी गावागावात पोहचवू…

लोणार : बुलढाणा जिल्हातील लोणार तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असून बऱ्याच गावात आंध आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून आजही विकासा पासून कोसो दूर आहे, याच भागातील टिटवी गावात आंध आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी जि प.सदस्य गोदावरी कोकाटे होत्या कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते, तसेच प्रमुख पाहुणे नवनियुक्त अकोला आदिवासी विकास  प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षा नंदिनी टारपे होत्या. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती बिरसा क्रांती दलाचे जिल्हाअध्यक्ष तथा नवनियुक्त सदस्य भगवानराव कोकाटे होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात मुंगसाजी माऊली व बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात केली यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे बोलताना म्हणाले की, आपला आदिवासी समाज प्रामाणिक आणि इमानदार आहे अशी समाजाची प्रतिमा आहे, परंतु आता आपला समाज व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे आपण इतर समाजाच्या नजरेतून आपली चांगली प्रतिमा गमावत आहोत. आता आपल्या समाजाने व्यसनापासून दूर गेले तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते, असे म्हणत तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेती सोबत जोड धंदा व्यवसायाकडे वळले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती भगवानराव कोकाटे यांनी आदिवासी कार्यालयाच्या उपाययोजना प्रत्येक आदिवासी गावागावात पोहचू व या आदिवासी बहुल भागात आदिवासीसाठी जास्तीत घरकुल मंजूर करून प्रत्येक आदिवासी बांधवाला घरकुल योजनेचा फायदा देण्यात येईल असे सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नंदिनी टारपे यांनी भाषणातून म्हणाल्या की समाजाला जर शहाणे, जागृत व त्याचे परिवर्तन करायचा असेल तर पैसा सोने, चांदी, नाणे, ब्लॅंकेट, फळे वाटून चालणार नाहीत तर समाज परिवर्तन करायचे असेल तर चांगले विचार वाटणे गरजेचे आहे. चांगले विचार वाटणे म्हणजेच खरे प्रबोधनाचे कार्य होय असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी नवं नियुक्त अकोला आदिवासी प्रकल्प कार्यलयाचे अध्यक्षा नंदिनी टारपे व सदस्य भगवानराव कोकाटे, सचिन पालकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुखराज शिंदे यांनी केले, दक्षता समितीचे अध्यक्ष केशव फुपाटे, सरपंच राजेंद्र चव्हाण, उपसरपंच गजानन साबळे, ज्ञानेश्वर साबळे, गजानन हळदे, परसराम कोकाटे, फकिरा तनपुरे, भगवान नामदेव कोकाटे, नामदेवराव माघाडे, संतोष ठाकरे, विष्णु अश्रूजी कोकाटे, एकनाथ घाटे, नामदेव ठोंबरे, उद्धव पारधी, टिटवी परिसरातील आंध आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

संबंधित लेख

लोकप्रिय