पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वूई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जी चळवळ झाली व त्यात १०६ लोकांना हौताम्य प्राप्त झाले. त्या सर्वांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सलीम सय्यद यांनी प्रास्ताविक केले. (PCMC)
यावेळी प्रमुख पाहुणे ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशन खडकी युनिटचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी उपस्थित राहून कामगार दिनाचे महत्व व अन्य माहिती दिली. ते म्हणाले, १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे आंदोलन झाले, दिग्गज नेत्यांनी मोठे आंदोलन केले. मुंबईसाठी हजारो कामगारांनी लाठ्या, काठ्या गोळीबार झेलला. १०६ हुतात्मे कामगार झाले. नंतरच्या काळात समृद्ध महाराष्ट्र निर्माण झाला. (हेही वाचा – लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु)
आजची परीस्थिती बदलली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनी एकूण चार कामगार कायदे आणले आहेत. त्यामुळे सर्वत्र खासगीकरण सुरू आहे. सामान्य कामगारांची पिळवणूक सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत तळागाळातील कामगार कमी वेतनात राबवला जात आहे. भविष्यात हा असंघटित कामगार टिकला नाही नाही तर राष्ट्र निर्माण होणार नाही, असे कामगार नेते सचिन कांबळे म्हणाले. (PCMC) आज या कामगारांचा सत्कार वुई टू गेदर फाउंडेशन करत आहेत, ही आनंदाची घटना आहे. (हेही वाचा – 10वी, 12वी चे निकाल कधी जाहीर होणार ? संभाव्य तारखा पहा !)
(PCMC)
यावेळी ज्यांचा नेहमी समाजाला उपयोग होतो, समाजाप्रती आस्था असते, उत्तरदायित्व घेतात, समाजाप्रती काहीतरी देणे आहोत अशी प्रतिमा असणारे जनआरोग्य, मैकेनिक, वर्कशॉप, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, इंडिस्ट्रिज, हॉस्पिटल. आदी विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले. तर खजिनदार दिलीप चक्रे यांनी आभार मानले. (हेही वाचा – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2795 पदांची भरती)
यावेळी स्वानंद राजपाठक, संतोषी कदम/पाटील, गौतम थोरात, गणेश जगताप, इजहार शेख, सचिन कांबळे, करण कोळी, आदींचा कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मधुकर बच्चे, सल्लागार रवींद्र सागडे, उपाध्यक्ष सोनाली मन्हास, सलीम सय्यद, दिलीप चक्रे, जयंत कुलकर्णी, क्रांतीकुमार कडुलकर खुशाल दुसाने, जावेद शेख, दिलीप पेटकर, मुकुंद इनामदार, सदाशिव गुरव, शंकर कुलकर्णी, विलास गटने, दारासिंग मन्हास, गणेश जगताप, पाटील काका, इजहार शेख, रवींद्र काळे, धनंजय मांडके, जाखीर सय्यद, अर्चना बच्चे, पोपट बच्चे, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (हेही वाचा – ब्रेकिंग : कोलकात्यातील हॉटेलला भीषण आग, 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी)