Thursday, July 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनिष्काळजीपणामुळे पाण्याच्या आणि गॅसच्या पाईप लाईन फुटल्या, नागरिक त्रस्त

निष्काळजीपणामुळे पाण्याच्या आणि गॅसच्या पाईप लाईन फुटल्या, नागरिक त्रस्त

खोदाई करताना फुटलेली पाण्याची व गॅस ची पाइपलाईन

पिंपरी चिंचवड : येथील पूर्णा नगर मध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. विशेषतः काँक्रीटीकरणासाठी जेसीबी मशिनमार्फत रस्त्यांची  खोदाई करताना निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे वारंवार विजेच्या वायर तुटत आहेत. चार चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. नववर्षाच्या सुरवातीला पाण्याच्या पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासकामे करताना कोणतीही काळजी घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी ओबीसी महिला शहराध्यक्ष सारीका पवार यांनी केला.

पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना लगेच फोन करून पाईपलाईन ताबडतोब दुरुस्त करण्यात सांगितले, आणि सारीका पवार यांनी स्वतः उभे राहून काम पूर्ण केले. अहोरात्र विकासकामामुळे रस्ता सुरक्षा ऐरणीवर आहे, तसेच खोदाईमुळे सर्वत्र धूळमाती पसरत आहे.

कॉंक्रीट रस्त्यामुळे पूर्णा नगरनगर मधील नागरिकांना नाहक मनस्ताप 

आज पूर्ण नगर मधील साई शक्ती व मारुती अंगण इमारत समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची (MNGL) पाईपलाईन फुटली. त्यामुळे प्रचंड आवाज व गॅसचा वास येऊन लोकांमध्ये घबराट पसरली होती. कंपनीच्या मेंटेनन्स विभागाला फोन करून ताबडतोब काम चालू केले. 

पूर्णा नगर मधील नागरिकांना रोजच लाईट, केबल तूटणे, पाण्याचे पाईप तूटणे, गॅस पाईपलाईन तुटणे याचा त्रास सहन करावा लागत आहे. कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून सदर कामाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये नागरिक वैतागले आहे, असे सारीका पवार यांनी सांगितले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय