Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

स्वस्तात गोवा फिरायचाय का ? मग ही वेळ सर्वात उत्तम !

पावसाळ्यात गोव्याला भेट देण्याचा तुमचा विचार आहे का? कदाचित नाही, कारण बहुतेक पर्यटक हंगामातच गोव्याला भेट देण्याचा विचार करतात, परंतु पावसाळ्यात गोव्याला भेट देण्याचे बरेच फायदे आहेत.गोव्यातील रिकामा समुद्रकिनारा, चहुबाजूंनी हिरवाईने नटलेला आणि जोरात कोसळणारा दूधसागर धबधबा याशिवाय पावसाळ्यात तुमच्या खिशालाही फायदा होतो. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात गोव्याला भेट देण्याचे फायदे सांगणार आहोत.

---Advertisement---



स्वस्त भाडे

पावसाळ्यात बहुतांश पर्यटक गोव्यापासून दूर राहतात. गोव्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ मानला जातो आणि गोव्यात पावसाळा जूनमध्ये सुरू होतो जो पर्यटन हंगाम नसतो, या काळात गोव्याला जाणारी उड्डाणे खूपच स्वस्त असतात. गोव्याच्या विमान तिकिटांची किंमत पावसाळ्यात गर्दीच्या हंगामाच्या तुलनेत जवळपास निम्मी असते.



स्वस्त हॉटेल्स

पावसाळी हंगाम हा ऑफ-सीझन असल्याने, यावेळी हॉटेल्स रिकाम्या राहतात, त्यामुळे तुम्ही 2- किंवा 3-स्टार हॉटेलच्या किमतीत 5-स्टार हॉटेलमध्ये राहू शकता, अशावेळी तुम्ही दिवसाला 500 रुपयांमध्ये समुद्रकिनाऱ्या समोरची खोली फक्त 500 रुपयांमध्ये मिळवू शकता.

---Advertisement---



गर्दीपासून शांतता

पावसाळ्यात बहुतेक पर्यटक गोव्यापासून दूर राहतात, त्यामुळे येथे गर्दी खूप कमी असते. गोव्याचे किनारे पावसाळ्यात पूर्णपणे रिकामे असतात, जिथे तुम्हाला पूर्णपणे खाजगी समुद्रकिनारा वाटेल. दूर दूरवर तुम्हाला कोणी दिसणार नाही.

उत्सवाचा एक भाग होण्याची संधी

गोव्यात पावसाळ्यात अनेक उत्सव आयोजित केले जातात. साओ जोआओ किंवा सेंट जॉन द बॅप्टिस्टचा प्रजनन उत्सव 24 जून रोजी साजरा केला जातो, तर सेंट पीटर्सचा उत्सव जुलैमध्ये आयोजित केला जातो, ज्यामध्ये नदीच्या मध्यभागी फ्लोटिंग स्टेज उभारले जातात. याशिवाय ऑगस्टमध्ये दिवार बेटावर बोंडेरम महोत्सव साजरा केला जातो. परेड आणि विविध ध्वजांनी उत्सवाची सुरुवात होते.

स्वस्तात खाण्याची सोय

जर तुम्हाला मासे खायला आवडत असतील तर तुम्ही या मोसमात गोवा भेट देऊ शकता, येथे तुम्हाला ताजे मासे मिळतात. अशातच या मोसमात येथील सी फूड देखील स्वस्त मिळते.



बजेट ट्रीपसाठी पावसाळ्यात गोव्याला भेट देणे उत्तम

गोव्यातील दूधसागर धबधबा पावसाळ्यात सर्वोत्तम असतो. या धबधब्याचे खरे सौंदर्य पावसाळ्यातच पाहायला मिळते. याशिवाय पर्यटन हंगाम नसल्यामुळे स्कूटर, कारचे भाडेही कमी होते. स्कूटर 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी भाड्याने मिळू शकतात. तुमच्याकडे फक्त भाव कमी करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात तुम्ही रिव्हर राफ्टिंगही करू शकता. जर तुम्ही निसर्गाच्या प्रेमात असाल तर तुम्ही गोव्यातील कोणत्याही मसाल्याच्या बागांना देखील भेट देऊ शकता.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles