Thursday, August 11, 2022
Homeकृषीवणी : शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर कडकडीत बंद

वणी : शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर कडकडीत बंद

spot_imgspot_imgspot_imgspot_img

शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करून खाजगीकरण बंद करण्याची मागणी

राजूर कॉलरी : केंद्रातील  भाजपच्या मोदी सरकारकडून करण्यात आलेला शेतकरी विरोधी कृषी कायदा, कामगार विरोधी श्रम संहिता, आरोग्य व शिक्षणाचे होणारे खाजगीकरण आणि देशातील सार्वजनिक उद्योग व सेवांचे होणारे खाजगीकरण रद्द करावे. यासाठी शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर ग्रामवासीयांनी स्वंयस्फूर्तीने कडकडीत बंद केले. तसेच वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.

ब्रेंकिंग : आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर, या दिवशी होणार परीक्षा 

शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करण्यासाठी राजूर येथे माजी पं स सदस्य अशोक वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली सर्व पक्ष व संघटनांनी एकत्र येत एक दिवस अगोदर  बैठक घेऊन गावातील व्यापारी व दुकानदारांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज २७ सप्टेंबर रोजी राजूर वासीयांनी  स्वयंस्फूर्तीने१००% कडकडीत बंद पाळुन मोदी सरकार चा शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणांच्या निषेध करण्यात आला.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करा, शेतकऱ्यांना दीड पट हमीभावाचा केंद्रीय कायदा करा, पेट्रोल-डिझेल व गॅस चे भडकलेले दर कमी करा, मनरेगा चे कामाचे दिवस आणि वेतन दुप्पट करा, खाजगीकरणाद्वारे देश विकणे बंद करा आदी मागण्यां चेनिवेदन राजूर ग्राम वासीयांद्वारे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले. 

हेही वाचा ! पहिल्याच प्रयत्नात मुख्य यूपीएससी परीक्षा पास होणारे जव्हार तालुक्यातील ‘डॉ. अजय डोके’

या आंदोलनात अशोक वानखेडे, मो. असलम, कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान, कॉ. नंदकिशोर लोहकरे, ऍड. अरविंद सिडाम, जयंत कोयरे,  अश्फाक अली, नितीन मिलमिले, राजेंद्र पुडके, महेश लिपटे, मो. शरीफ, एह्तेश्याम सिद्दीकी, अशोक भगत, लीलाधर अरमोरीकर, सरोज मून, शेख ताहीद, रायभान उईके, सुनील कुंभेकर, सोमेश्वर जांगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय