Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणवडवणी : शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी भाजपा रस्त्यावर उतरणार

वडवणी : शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी भाजपा रस्त्यावर उतरणार

spot_imgspot_imgspot_imgspot_img

वडवणी (लहू खारगे) : वडवणी तालुक्यात सलग एक महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरु असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची कोणताही अटकळ न घालता सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी तसेच पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी वडवणी तहसील कार्यालयावर ३० सप्टेंबर रोजी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या मागण्या…

– मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५०,००० रु. मदत द्या.

– सन २०२० चा थकीत पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा.

– वडवणी तालुका हा ओला दुष्काळ म्हणुन जाहीर करा.

– पावसामुळे तालुक्यातील घरांची पडझड झालेल्या लोकांना मदत जाहीर करा.

– शेतकऱ्यांना चालू हंगामातील कर्ज माफ करुन त्यांना नव्याने तात्काळ कर्ज द्या.

या मागण्यांसह इतर मागण्या करीता हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी दिली. तसेच त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पोपटराव शेंडगे, मच्छिंद्र झाटे, रामेश्वर जाधव, बाळासाहेब राऊत बद्रीनाथ व्हरकटे, लहू काळे, महादेव सावंत, महादेव शेंडगे उपस्थित होते‌.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय