Voting : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान होत आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. (voting)
20 दिंडोरी लोकसभा मतदार संघात 18 लाख, 53 हजार, 387 तर 21 नाशिक लोकसभा मतदार संघात 20 लाख, 30 हजार, 124 मतदार मतदानाचा अधिकार बजाविणार आहेत. नाशिकमध्ये 1 हजार 910 तर दिंडोरीमध्ये 1 हजार, 922 मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची पूर्तता झालेली असून एकूण 110% प्रमाणात 17 हजार 28 कर्मचारी केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. ज्यामध्ये एकूण 5 हजार 82 महिला कर्मचारी आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात 955 केंद्रावर तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 961 केंद्रावर वेबकास्टींगची पुर्वतयारी पुर्ण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 2 हजार 317 ठिकाणी व्हीलचेअरची तसेच 622 मतदारांना वाहतुक सुविधा पुरविण्याची पुर्वतयारी करण्यात आलेली आहे.
20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता 130 तर 21 नाशिक लोकसभा मतदार संघाकरिता 240 सूक्ष्म निरीक्षक (Micro Observer) यांची नेमणूक करण्यात आली असून सदर नियुक्त करण्यात आलेले सूक्ष्म निरीक्षक हे त्यांचा अहवाल मा. मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील.
हेही वाचा :
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर