Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याVoters : मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

Voters : मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

Voters : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. (voters)

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन दक्ष आहे.

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाईल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे यादव यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय