Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यमराठा समाज सांगली तर्फे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट

मराठा समाज सांगली तर्फे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट

सांगली : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दिनांक 11 मे 2021 रोजी  मराठा समाज सांगली यांच्या वतीने आणि कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समिती सांगली यांच्या सहकार्याने होम आइसोलेशन मध्ये असलेल्या कोरोना रुगणांच्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन मराठा समाज भवन येथे उपलब्ध करुण देण्यात आले.

गरजवंत लोकांना अडचणीच्या काळात श्वास देऊन जीवनदान देण्यासाठी या मशीन जीवनदायीनीचे काम नक्की करतील. या कार्याचा शुभारंभ आज मराठा समाज सांगलीचे अध्यक्ष अँड उत्त्तमराव निकम यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत, सरचिटणीस बाबासाहेब भोसले, ए.डी.पाटील, अभिजीत पाटील, डॉ मोहन पाटील, तानाजी मोरे, विकास मोहीते, जयवंत सावंत, अँड विलासराव हिरुगडे-पवार तसेच कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समिती सांगलीचे सतिश साखळकर, प्रशांत भोसले, आनंद देसाई हे उपस्थित होते.

होम आयसोलेशन मध्ये आलेल्या रुग्णाना मशीनची आवश्यकता असल्यास सतिश साखळकर 9881066699, मराठा समाज सांगली – 9579988290 या क्रमांक वर संपर्क करण्याचे आवहान मराठा समाज सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय