Monday, July 15, 2024
Homeराज्यअष्टविनायक गणपती दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त काही तासांत

अष्टविनायक गणपती दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त काही तासांत

जुन्नर : राज्यातील गणेशभक्त अष्टविनायक गणपती दर्शन हे श्रद्धा म्हणून चोवीस तासांत पूर्ण करतात; परंतु ज्या गणेश भक्तांकडे वेळ कमी आहे अशा व्हीआयपी भक्तांसाठी अष्टविनायक गणपतींचे दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त पाच तासांत करता येणार आहे.

तर सर्वसामान्य भक्तांसाठी वातानुकूलित बसद्वारे व्हीआयपी दर्शनाचा उपक्रम अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थानच्या वतीने सर्व विश्वस्त व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राबविणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.

जुन्नर : माणकेश्वर येथे महिला बचतगटाने सुरू केला लाकडी तेलघान्याचा व्यवसाय

तसेच कवडे म्हणाले, प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देवस्थान आठ व्यक्तींची क्षमता असलेले हेलिकॉप्टर भाडे करारावर घेणार आहे ‌‌. अष्टविनायकातील सर्व देवस्थानाबरोबर संपर्क झाला असल्याचेही ते म्हणाले.

ओझर या ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला सुरूवात होणार आहे. रांजणगाव (महागणपती) यांच्याबरोबर संपर्क झाला असून, सिद्धटेक (सिद्धिविनायक), थेऊर (चिंतामणी), मोरगाव (मयूरेश्वर), महाड (वरदविनायक), पाली (बल्लाळेश्वर) व शेवटी लेण्याद्रीच्या गिरीजात्मज गणपतीचे दर्शन झाल्यानंतर वातानुकूलित बसद्वारे भाविकांना ओझर येथे आणण्यात येणार आहे.

जुन्नर : आंबोली येथे श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे ‘श्रमसंस्कार शिबीर’ उत्साहात संपन्न !

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय