Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयVinesh Phogat : विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा...

Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा !

Paris Olympics : पेरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी मोठा धक्का बसला आहे. महिला कुस्तीच्या 50 किग्रॅ वजनगटातील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh phogat) यांना अधिक वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी क्यूबाच्या लोपेज गुजमानला 5-0 ने पराभूत केले होते आणि ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू बनल्या होत्या.

विनेश फोगाटच्या (Vinesh phogat) पॅरिस ओलंपिक मधील अपात्रेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर विनेशला प्रोत्साहन देत एक भावनिक संदेश लिहिला आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, विनेश, तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजची ही घटना खूप दुखावणारी आहे. मी जे दुःख अनुभवत आहे ते शब्दांत सांगू शकत नाही.

Vinesh phogat disqualified

पंतप्रधान पुढे म्हणाले, मला माहित आहे की तुझ्यात लढण्याची ताकद आहे. आव्हानांना सामोरे जाणे तुझ्या स्वभावातच आहे. तू आणखी बळकट होऊन परत ये. या कठीण क्षणी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.

विनेशच्या या संघर्षमय प्रवासात देशातील प्रत्येक नागरिक तिच्यासोबत आहे, असे मोदींनी आपल्या शब्दांतून व्यक्त केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

संबंधित लेख

लोकप्रिय