Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणडांग सिमावर्ती भागातील गावे चार दिवसांपासून अंधारात !

डांग सिमावर्ती भागातील गावे चार दिवसांपासून अंधारात !

काळोखात घराबाहेर पडतानांना विंचू, काट्याची भीती

सुरगाणा (दौलत चौधरी) : डांग सिमावर्ती भागातील गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत. काळोखात घराबाहेर पडतानांना विंचू, काट्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तोक्ते वादळ जाऊन दोन दिवस झाले मात्र अंधाराचे जाळे मिटले नाही. सिमावर्ती आदिवासी डांग भागातील रगतविहीर,  पिंपळसोंड, मालगोंदा, खुंटविहीर, झारणीपाडा, बर्डीपाडा, मांधा, राक्षसभुवन, खिर्डी, भाटी, सागपाडा, चिंचले, केळीपाडा या भागातील नागरिकांवर आली आहे. 

वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर पडल्याने विज वितरण कंपनी कडे कमी मनुष्यबळ तसेच तुटपुंजी साधन सामुग्री असल्याने सर्व काही ठीक होण्यास, दिवे लागायला अजून तरी सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटणार हे ठरलेले आहे. गावोगावी विज पोहचल्याने पिण्याचे पाणी,दुरदर्शन, मोबाईल, पिठाची गिरणी हे सर्व अचानकपणे बंद झाल्याने अंधारापेक्षाही काळोखात चाचपडण्याची वेळ आदिवासीं बांधवांवर आली आहे. 

विज नसल्याने सातच्या आत सर्वत्र सामसूम जाणवत आहे. विजे अभावी सगळी कडे स्मशान शांतता पसरली आहे. बाहेर निघायला विंचू, काटा, जंगली श्वापदे, हिंस्र प्राणी यांची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. 

पुर्वी शासनाकडून रेशन कार्डावर राॅकेल मिळत होते. या राॅकेलचा वापर आदिवासी भागात पावसाळ्यात आठवडाभर विज नसल्याने चिमणी, कंदील पेटविण्यात करीता केला जात असे. शासनाचे गॅस दिल्याने तो बंद पुरवठा बंद केला. राॅकेल हे आदिवासी  भागात  स्वयंपाका करीता वापरले जात नव्हते. त्यामुळे राॅकेल नसल्याने दिवाळी सारखे गोडेतेलाचे दिवे, पणत्या लावण्याची वेळ आली आहे.

खाजगी बोअरवेल, सार्वजनिक विहीरी वरचे पंप चार ते पाच दिवसा पासून बंद असल्याने जंगलातील पाणवठ्यावर दुर दुर हंडे डोक्यावर घेऊन रानोमाळ  पिण्याचे पाणी शोधण्याचीही वेळ आली आहे. 

सर्व काही ठीक होईलही परंतु पिण्याचे शुद्ध पाणी  मिळाले नाही, पिण्याच्या पाण्यात बदल झाला तर एखादी सर्दी तापाची साथ उद्भवू शकते. सिमावर्ती  भागात लगतच गुजरात राज्यात केवळ दिडच दिवसात विज वितरण यंत्रणा सुरळीत पणे कार्यान्वित होऊन रुळावर आली आहे. पिंपळसोंड,उंबरपाडा येथील महिलांना दोन ते अडीच किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. तर तारांवर बेलाचे झाड पडले आहे. त्यामुळे तारा जीनीवर पडल्या आहेत.  विज वितरण कंपनीचे कर्मचारी रांत्रदिवस सुरु आहे.

वादळ वाऱ्यामुळे ठिकठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे सुरगाणा व शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या चाळीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित राहिल्याने सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे.

तोक्ते वादळाचा तडाखा सुरगाणा तालुक्याला देखील बसला असून तालुक्यात ठिकठिकाणी विजेच खांब कोसळले आहेत. या वादळामुळे दिंडोरी कडून सुरगाणा तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला होता. सुरगाणा येथे नगरपंचायत कार्यालया पासून काही अंतरावर असलेले तीन विद्युत खांब कोसळले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोल उभे करण्यात येऊन तारा ओढण्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारींना जोरदार पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अडचणी येत होत्या. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. दरम्यान मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा सुरू झाला. मात्र तो नियमित राहू शकला नाही. बुधवारी सकाळी उशिरा नंतर शहरातील काही भागात वीजपुरवठा सुरू झाला. तर काही ठिकाणी दुरूस्तीचे काम अद्यापही सुरू आहे. विज कर्मचाऱ्यांकडून आदिवासी भागातील काम युद्ध  पातळीवर सुरू आहे. 

“अतिदुर्गम  भागातील अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे उन्मळून  पडली आहेत. वादळी  वाऱ्यासह झालेल्या रिपरिप पावसाळा मुळे कामात अडथळा येत होता. काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी थोडा संयम पाळून विज वितरण कंपनीस सहकार्य करावे. काही तासातच विज पुरवठा सुरळीत करण्यात येईल.”

 – तुषार कापसे, उपकार्यकारी अभियंता सुरगाणा

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय