Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणकोटमवाडी येथील ग्रामस्थांनी दिले आमदार अतुल बेनके यांना विविध मागण्यांचे निवेदन

कोटमवाडी येथील ग्रामस्थांनी दिले आमदार अतुल बेनके यांना विविध मागण्यांचे निवेदन

जुन्नर (पुणे) : कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोटमवाडी महसुली गाव करुन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन आमदार अतुल बेनके यांंना निवेदन देण्यात आले.

 

कोटमवाडी ते शेळकेवस्ती गावाअंतर्गत ४ किलो मीटर रस्ताचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळगाव जोगा धरणावरून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन करण्यात यावी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी कंपाऊंड तयार करण्यात यावे, वाचनालय साहित्य व व्यायामशाळा देण्यात यावे, या मागण्यांंचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे पुुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, राजू शेळके, ज्ञानेश्वर शेळके, मारुती गवारी, गणपत गवारी , राजेंद्र सांगडे, विजय सांगडे, तुकाराम शेळके यांच्यासह कोटमवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय