Sunday, September 8, 2024
Homeराज्यराजकिय भुमिका घेतल्याने "मुलगी झाली हो" मालिकेतून विलास पाटिल यांना काढले?

राजकिय भुमिका घेतल्याने “मुलगी झाली हो” मालिकेतून विलास पाटिल यांना काढले?

Photo : Kiran Mane (Facebook)


मुंबई : स्टार प्रवाह वरील “मुलगी झाली हो” या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढुन टाकण्यात आल्याने नवा वाद उभा राहिला आहे. 

अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढल्याचे त्यांना फोनवरून सांगण्यात आले. यांनी राजकिय भुमिका घेतल्याने त्यांना या मालिकेतून काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांना या मालिकेतून काढल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, समर्थकांकडून #IStandWith_KiranMane हि मोहिम देखील राबविण्यात येत आहे.

हेही वाचा ! बंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

अभिनेते किरण माने हे फेसबुकवर फार सक्रिय असतात, ते सातत्याने वेगवेगळ्या पोस्ट करत असतात. अलिकडच्या त्यांच्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल देखील करण्यात आले होते. माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मी शाहु, फुले, आंबेडकर, संत तुकाराम यांच्या विचारांचा असुन मी पुरोगामी विचार मानणारा आहे, तसेच हा अभिनय क्षेत्रात झालेला खून असल्याचे अभिनेते किरण माने यांनी म्हटले आहे.


राजकिय भुमिका घेतल्याने अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम चालविली गेली, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले, असा आरोप माने यांनी केला आहे. माने हे स्टार प्रवाह वरील “मुलगी झाली हो” या मालिकेत ‘विलास पाटिल’ची भुमिका साकारत होते.

तसेच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अभिनेते माने यांनी राजकिय भुमिका घेतल्याने ते भाजपला सहन झाले नाही त्यामुळे त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

या प्रकरणावर अद्याप “स्टार प्रवाह”कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, त्यामुळे स्टार प्रवाहच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

संबंधित लेख

लोकप्रिय