Thursday, January 23, 2025

बेकायदेशीर बांधकामाविरोधात विजय नागवेकर यांचे आमरण उपोषण

रत्नागिरी : गाव मौजे टेंभ्ये ता.जि.रत्नागिरी येथील सहहिस्सेदार यांची कोणतीही परवानगी न घेता कृष्णकांत केशव नागवेकर यांनी बांधलेल्या घराला अभय देण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत टेंभ्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी, सहाय्यक नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरी, तालुका निरिक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या भोंगळ आणि पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ विजय नामदेव नागवेकर निवृत्त कर्मचारी सहाय्यक नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरी यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी समोर आमरण उपोषण छेडले आहे. 

ब्रेकिंग : सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला धक्का, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द

यापूर्वी विजय नागवेकर यांनी संबंधित कार्यालयाकडे असंख्य पत्रव्यवहार केला होता. परंतु संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष केले व समाधान कारकही उत्तरं दिली नाहीत. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असूनसुद्धा कार्यालयाने घरबांधणीस परवानगी का दिली? असा सवाल त्यांनी केला आहे. 

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २३४ जागांसाठी भरती

उपोषण दरम्यान जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित अधिकारी यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करणारे पत्र सदर अधिकारी घेऊन आले. म्हणून त्यांनी त्यांचे पत्र घेण्यास नकार दर्शविला.

कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात?

सदर प्रकरणात राजकीय लोकांचा हात असल्यामुळे त्यामुळे आपल्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे, असेही विजय नागवेकर म्हणाले.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा


Related Articles

- Advertisement -

Latest Articles