जुन्नर : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी विजय लोखंडे, उपसभापतीपदी दत्ता घोडे, खजिनदारपदी अंबादास वामन, मानद सचिवपदी ज्ञानेश्वर गवारी, सरचिटणिसपदी विवेकानंद दिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अधिकारी निलेश धोंगडे यांच्या अध्यक्षते खाली रविवार दि. 27/11/2022 रोजी पतसंस्थेच्या राजा शिवछत्रपती सभागृहात सदर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. शताब्दी वर्षात कारभार पाहण्याची संधी मिळालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या फेटा, पुष्पहार, शाल देवून करण्यात आला व हार्दिक अभिनंदन केले.
सत्कार समारंभाचे अध्यक्ष मावळते सभापती संदीप थोरात होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख मंगेश मेहेर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले, नेते सदू मुंढे, सरचिटणीस संतोष पानसरे, कार्याध्यक्ष सयाजी चिखले, कोषाध्यक्ष शरद वारुळे, प्रसिद्धी प्रमुख दिनेश मेहेर, प्रवक्ते अन्वर सय्यद, एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश देठे, माजी सभापती साहेबराव मांडवे तक्रार निवारण समिती सदस्य भरत बोचरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, मानद सचिव आणि खजिनदार यांनी सर्व सभासदांच्या आर्थिक हिताला व पतसंस्थेच्या प्रगतीला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव सदाकाळ यांनी केले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने अनेक सभासद भगिनी, शिक्षक संघ शिलेदार, पतसंस्थेचे माजी संचालक , पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी सभापती वसंत फापाळे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.


