पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.12 – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड यांनी दीड दिवस पायी वारी चालून वारीतील सुखद अनुभव घेतला. दिंडी क्रमांक 98 जोपादेवी व दिंडी साहित्यिकांची यामध्ये फुगडी खेळून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पाई वारीचा अनुभव घेतला.
भक्ती मय वातावरणात भारुडे, गौळणी, हातात विणा घेऊन, प्रत्यक्ष सहभाग होऊन वारकऱ्यांबरोबर पायी वारीचा अनुभव घेऊन मी स्वतः वारकऱ्यांचा वेशभूषेत तर संगिता जोगदंड जनाबाई च्या वेषभूषा करून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पहिल्यांदा 12 किलोमीटर चे अंतर पार केले. सुखद अनुभव आयुष्य भर आठवणी राहतील असे शहराध्यक्ष आण्णा यांनी म्हटले आहे दरवर्षी पालखीत जाण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा संजना करंजवणे, कार्याध्यक्ष गजानन धाराशिकर, मुरलीधर दळवीसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वारकऱ्यांवरील लाठीमाराने वारीला गालबोट; सखोल चौकशी करून पोलिसांवर कारवाई करा
PCMC विडिओ : हजारो भाविकांनी घेतले दर्शन तुकोबारायांच्या पालखीला भक्ती भावाने निरोप
साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले भाविक भक्तांचे लक्ष