“सांस्कृतिक क्षेत्राचे नियोजन , धोरण ठरवताना मग ते दुरुस्ती, खाजगीकरण करायचे किंवा नाही करायचे कोणत्या गोष्टीमुळे या शहरात सांस्कृतिक वैभवाची भर पडेल यासाठी सांस्कृतिक तज्ज्ञ कमिटीची आवश्यकता” – भाऊ भोईर, अखिल भारतीय मराठी परिषद मध्यवर्ती शाखा उपाध्यक्ष
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – नाट्यगृह उभारणीच्या दुरुस्तीसाठीचे धोरण ठरवत असताना किंवा कोणत्याही सांस्कृतिक क्षेत्राचे नियोजन , धोरण ठरवताना मग ते दुरुस्ती, खाजगीकरण करायचे किंवा नाही करायचे कोणत्या गोष्टीमुळे या शहरात सांस्कृतिक वैभवाची भर पडेल यासाठी सांस्कृतिक तज्ज्ञ कमिटीची आवश्यकता असते. एखादी नवीन नाट्यगृहाची वास्तू उभारण्यासाठी २२ ते २४ कोटी खर्च येतो आपल्या येथे दुरुस्तीला एवढा खर्च आला आहे , यामध्ये असं काय क्रांतिकारक काम केले आहे ? यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार साकल्याने व्हावा. या शहरातील सांस्कृतिक कला यांचा विचार करण्यासाठी तज्ञ मंडळींचे गरज असते, अधिकारी म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत का ? त्यांना एवढा विसर पडला आहे का ? या शहरात सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिलेले कुणी मंडळी नाहीत का संस्था नाहीत का? आमच्यासाठी काही राजकीय असल्यामुळे आम्हाला गृहीत धरू नका परंतु येथे अनेक तज्ज्ञ व्यक्ती आहेत ज्यांनी या शहराच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी समर्पण, त्याग केले आहेत सातत्याने या सांस्कृतिक चळवळीत सहभाग देत असताना मात्र ज्यांचा सांस्कृतिक क्षेत्राशी आयुष्यभर काही संबंध आलेला नाही त्यांनी या शहराचे नियोजन करायचे काय ? पुणे शहरामध्ये हे खपून घेतले नसते, राजकीय लोकांच्या संवेदना बोथट होऊ लागल्या आहेत यांना राजकीय सत्तेचा अर्थकरण्याचा सत्तेसाठी समीकरण कसे करता येईल या पलीकडे यांचा कोणताही हेतू नसतो, राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही क्षेत्र असतात ज्या हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीचे रक्षण करतात ते सांस्कृतीक क्षेत्राने केले आहे.
या क्षेत्राचे संवर्धन प्रथम करा , मग ब्रिज बांधा , रस्ते बांधा आणि अनेक गोष्टी करा, भौतिक प्रगतीतून बौद्धिक प्रगती होत नाही , संस्कारक्षम पिढी घड विण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे , उगीच कोणी शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणत नाहीत. असे परखड मत भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय मराठी परिषद मध्यवर्ती शाखा उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे. परंतु येथे चांगले कोणाचे ऐकायचं नाही फक्त राजकानात ‘मी केलं आमूक मी केलं या प्रसिद्धीतून हे धोरण होत नाही .माझे आयुक्तांना आवाहन आहे सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्या मग निर्णय घ्या, निविदा काढणे एवढे सोपे काम नाही तुम्ही आयुक्त किती दिवस आहात ? आज आहात उद्या कदाचित तुमची बदली होईल परंतु परिणाम संपूर्ण शहराला भोगावे लागतील तुम्ही आयुक्त नव्हे तर या शहराचे नागरिक म्हणून काम करा, असे भाऊसाहेब भोईर म्हणाले.
शहरातील कलाकार नाराज
खरे तर या शहराचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी गत काही वर्षांपूर्वी या शहरातील विविध संस्था प्रतिनिधी, ज्येष्ठ कलावंत मंडळी, सर्वच कला क्षेत्रातील जाणकार अशा १०० हून अधिक लोकांना आयुक्तांनी पिंपरी चिंचवड मनपा कार्यालयात सभेसाठी बोलविले होते. त्यावेळी केलेल्या चर्चेतून व दिलेल्या अनेक सूचनातून खरे तर एक असे सांस्कृतिक धोरण अस्तित्वात यायला हवे होते ज्याचा उपयोग करून शहराची सांस्कृतिक जडणघडण ही विस्तारता आली असती परंतु विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मनपा कधीच येथील कलाकारांना सन्मानाने बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे प्रयत्न करीत नसताना दिसते. खरे तर पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक ओळख देण्याचे काम भाऊसाहेब भोईर यांनी त्यांच्या परिषदेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे चालू ठेवले आहे. पक्षीय अहहमिका बाजूला ठेवून खरे तर त्यांना निळू फुले प्रेक्षागृह आणि गदिमा प्रेक्षागृह यांच्या उद्घाटनासाठी बोलविणे गरजेचे होते परंतु तसे न करता केवळ सत्ताधारी पक्षाच्या लोकांची, म्हणजे ज्यांचा सांस्कृतिक चळवळीशी संबंध नाही अशा लोकांनाच बोलविण्यात आले होते. सांस्कृतिक संस्था आणि जुने जाणते ज्येष्ठ कलाकार यांना या शहरात कधी योग्य तो मान मिळेल याची सामान्य रंगकर्मी म्हणून मला प्रतीक्षा आहे.
किरण येवलेकर – नाट्य कलावंत, चिंचवड