Wednesday, February 12, 2025

व्हिडिओ : स्वतःच्या लग्नात नवरदेव असा नाचला की कोरिओग्राफर लाजला

पुणे : लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बर्‍याच व्हिडिओंमध्ये, वधूची एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेते. पण या लग्नात थोडसं हटके झालेलं आपल्याला पाहायला मिळाले. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. वऱ्हाडी मंडळींसाठी लग्न म्हणजे जेवण.

वरातीतील लोक आपल्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधतात. या डान्स व्हिडिओंमध्ये लोक नागिन डान्स करण्यासोबतच जमिनीवर लोळताना तसंच अनेक अजब डान्स स्टेप्स करताना दिसतात. सध्या लग्नातील अशाच एका डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात आपल्या लग्नाच्या आनंदात नवरदेवच जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.



त्याच्या डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांचंही मन जिंकलं आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाचा जबर आणि अनोखा डान्स पाहून नेटकरीही तोंडात बोटं घालत आहेत. यात नवरदेव डीजेच्या गाण्यावर डान्स स्टेप करताना दिसत आहे.ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles