Thursday, January 16, 2025
HomeNewsवाळूज येथे आशा व गटप्रवर्तक यांचा विजयी मेळावा संपन्न

वाळूज येथे आशा व गटप्रवर्तक यांचा विजयी मेळावा संपन्न

औरंगाबाद : आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी सीटू संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हा सीटू चे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य सीटू चे सचिव काॅ लक्ष्मण साकृडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कॉ दामोदर मानकापे  व कॉ मंगल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली शहीद भगतसिंग हायस्कूल बजाज नगर वाळूज येथे दि. १० जुलै २०२१ रोजी आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी यांचा विजयी मेळावा संपन्न झाला.

१५ जून ते २३ जून २०२१ या काळात संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटने सोबत चर्चा करून १५०० ते २००० रुपये प्रति महिना वाढ व अन्य कांही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे तालुका गंगापूर येथील ५०० आशा व गटप्रवर्तक यांचा ज्योती भोसले व वैशाली शिंदे यांनी विजयी मेळावा आयोजित केला.

यावेळी कॉ. लक्ष्मण साकृडकर, कॉ. दामोदर मानकापे, संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. पुष्पा पैठणे, पुष्पा शिरसाठ, संगिता जोशी, स्वाती काळे, विमल शिरसाठ, किरण गायकवाड, अनिता चंदलवाडे, यांनी आशांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. ज्योती भोसले यांनी केले, तर सुत्रसंचालन कॉ. शंकर ननुरे यांनी केले. कॉ. वैशाली शिंदे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.


संबंधित लेख

लोकप्रिय