मावळ : सुदवडी – जांबवडे रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी बोलताना अपर्णा दराडे म्हणाल्या, वारंवार निवेदने देऊनही गेली कित्येक वर्षे हा रस्ता निधी मंजूर होऊनही झालेला नाही. याला सुदवडी ग्रामपंचायत व मावळ प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचा नाकरतेपणा जबाबदार असल्याचे दराडे म्हणाल्या.
हेही वाचा ! पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू तर ६ जखमी
रस्त्यावर प्रचंड चिखल आणि खड्डे पडल्यामुळे अपघात होत असतात. जीवितहानी झाल्यास याला प्रशासनच जबाबदार असेल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
येत्या काही दिवसांत जर या रस्त्याचे दुरूस्तीकरण झाले नाही तर अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया साईसृष्टी, सुदवडी ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?
यावेळी गणेश दराडे, अपर्णा दराडे, पाऊसू करे, दौलत शिंगटे, अनिता करे, सुप्रिया शिंगटे, रामेश्वर गायकवाड, चद्रकांत जाधव, महादेव सुरुवसे, अशोक उजागरे, बाळासाहेब शिंदे आदीसह उपस्थित होते.