Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवास्तूविशारद (आर्किटेक्टचर) ही प्राचीन कला-सुंदर वास्तूरचनेमुळे शहराचे सौंदर्य वाढते - अतिरिक्त आयुक्त...

वास्तूविशारद (आर्किटेक्टचर) ही प्राचीन कला-सुंदर वास्तूरचनेमुळे शहराचे सौंदर्य वाढते – अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट पिंपरी चिंचवड सेंटर चे पदग्रहण समारंभ संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.01 जुलै
– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट पिंपरी चिंचवड सेंटर चे पदग्रहण समारंभ प्राण प्रतिष्ठा हॉटेल ब्ल्यू वॉटर, पूनावळे येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाची प्रस्ताविक माजी अध्यक्ष आर्किटेक्ट शशांक फडके यांनी केली. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांनी त्यांचा मागील वर्षाचा आढावा मांडला.



या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे असलेले आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी आर्किटेक्टचा शहराच्या सुंदर चित्रीकरणासाठी काय महत्त्वाचा वाटा असतो ते सांगितले व आपल्या जुन्या अनुभवांवर उजाळा घातला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील यांनी देखील सर्व वास्तू विशारद यांचे कौतुक करताना सांगितले की, सुंदर वास्तू रचनेमूळेच शहराचे सौंदर्य वाढते. वास्तूविशारद ही प्राचीन कला आहे. आधुनिक युगात नागरिकांची घरे, महाविद्यालये, विज्ञान केंद्रे, नाट्यगृहे ईई एकूण शहरातील विविध स्थापत्य, चौक, बागीचे विभागाशी संबंधित प्रकल्पाच्या डिझाइन अतिसुंदर व विलोभनीय बनवण्यात आर्किटेक्ट चे योगदान मोठे असते. शहराचे सौंदर्य वाढवण्याचे काम वास्तू विशारद करत असतात. त्यामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होते.



शहराच्या विकासासाठी वास्तुविशारद यांच्यासोबत वारंवार चर्चासत्र घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष आर्किटेक्ट पारस नेत्रगावकर यांनी त्यांचा पुढील शहर विकासाचा व सुशोभीकरणाचा दूरदृष्टीकोन ध्वनिचित्रीके मार्फत प्रदर्शित केला. यानंतर अध्यक्ष यांनी त्यांच्या सण २०२३-२५ नवीन कार्यसमितीचे उपाध्यक्ष आर्किटेक्ट हृषिकेश देवरे, सचिव आर्किटेक्ट उमेश नामदे, खजिनदार आर्किटेक्ट राजेंद्र जोशी, सभासद आर्किटेक्ट मधुरा बुटाला, आर्किटेक्ट अनुराधा गोवर्धन, आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, आर्किटेक्ट माणिक बुचडे, डॉ. आर्किटेक्ट अजिंक्य निफाडकर व आर्किटेक शाश्वता जोशी यांचा पदग्रहण संपन्न झाला असे घोषित केले.



यावर्षी डॉक्टर पदवी ग्रहण केलेले डॉ. आर्किटेक अजिंक्य निफाडकर व डॉ. आर्किटेक स्वप्निल शेठ यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपस्थित डॉ. आर्किटेक्ट गौरी शिऊरकर, आर्किटेक्ट अपर्णा पणगंटी व आर्किटेक्ट विकास आचलकर यांनी देखील अध्यक्षांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक्ट मृणालिनी साने व आर्किटेक्ट रक्षंदा पलांडे यांनी केले. कार्यक्रम सरती उपाध्यक्ष आर्किटेक्ट हृषिकेश देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



‘ईडी’ग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये सामील – मानव कांबळे

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

शिरुरमधील गंगावणे कुटुंबियांचे आमदार महेश लांडगेंकडून सांत्वन

संबंधित लेख

लोकप्रिय