Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याVasant More : पुण्यात वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी

Vasant More : पुण्यात वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी

Vasant More : वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शिरुरमधून मंगलदास बांदल, नांदेडमध्ये अविनाश बोसिकर तर परभणीतून बाबासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुण्यातून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी मंगळवारी (दि.२) उमेदवारी जाहीर झाली. वंचितने मंगळवारी रात्री तिसरी यादी जाहीर केली. या यादीत पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत वंचितने २४ जागांवर उमेदवार जाहीर केले आहे.

भारतीय जनता पक्षाने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर कॉंग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या लोकसभेसाठी मैदानात उतरवले आहे. आता वंचितने वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वंचित बहुजन आघाडीला मानणारा पुण्यात मोठा वर्ग आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ६२ हजार मते मिळवली होती. तर, मोरे यांचीही ताकद आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, बारामती मतदारसंघात वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

तसेच, शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून डॉ.अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता शिरूर लोकसभेत आता तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय