Vande Bharat Express : अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने आता देशभरात आणखी विस्तार केला आहे. 15 सप्टेंबरपासून देशभरात नव्या दहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील समाविष्ट आहे.
या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या पुणे ते हुबळी (२०६६९) आणि हुबळी ते पुणे (२०६७०) या मार्गावर धावतील. या गाड्या मिरज, सांगली आणि सातारा येथील प्रवाशांसाठी एक मोठा लाभ घेऊन येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर सांगली स्थानकावर थांबा देण्याची मंजुरी दिली आहे, त्यामुळे स्थानिक प्रवाशांना सुविधांचा लाभ मिळणार आहे.
पूर्वी पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गावर सांगली आणि मिरज येथे थांबा देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्टचे अध्यक्ष कैलास वर्मा पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबण्याची विनंती रेल्वे कडे केली होती.
या मागणीला उत्तर देत रेल्वे मंत्रालयाने दोन वंदे भारत एक्सप्रेससाठी मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबण्याची विनंती रेल्वे कडे केली होती.
ही वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून, पूर्णपणे वातानुकूलित असेल. गाडीचा वेग 66 किलोमीटर प्रति तास असेल, आणि पुणे-हुबळी अंतर 558 किलोमीटर असेल. सोमवारी सोडून ही गाडी दररोज धावणार आहे.
Vande Bharat Express
या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे ते सांगलीचा प्रवास आता केवळ 3 तास 55 मिनिटांचा होईल, आणि सांगली ते हुबळीचा प्रवास 4 तास 33 मिनिटांचा असेल. प्रवाशांना वर्धित सुविधा आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येईल.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती