Vanchit Bahujan Aghadi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर करण्यात आली.
महाविकास आघाडी आणि महायुती अद्याप जागा वाटपावर चर्चा सुरू असताना वंचितने उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांमध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव आणि खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
या यादीत रावेर – शमिभा पाटील, सिंदखेड राजा – सविता मुंडे, वाशिम – मेघा डोंगरे, धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे, साकोली – डॉ. आविनाश नन्हे, नांदेड दक्षिण – फारुख अहमद, लोहा – शिवा नरांगळे, छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर – संग्राम माने यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती