पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम येथे १६ मे २०२५ रोजी घडलेल्या वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagavane case) यांच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर शुक्रवारी (२३ मे २०२५) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली.
वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagavane case) यांचा मृतदेह १६ मे रोजी भूकूम येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु वैष्णवीच्या वडिलांनी, आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी, बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि खुनाचा गंभीर आरोप केला होता. (हेही वाचा : शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ)
वैष्णवीचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला की, वैष्णवीचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असून, तिच्या शरीरावर १९ ठिकाणी मारहाणीच्या जखमा आढळल्या. या अहवालामुळे वैष्णवीची आत्महत्या नसून खून असल्याचा संशय बळावला. (हेही वाचा : पत्रकार अर्णब गोस्वामी आणि भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून गुन्हा दाखल)
Vaishnavi Hagavane Death Case | हुंडा आणि छळाचे आरोप
वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या लग्नावेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. याशिवाय, सनीज वर्ल्ड येथे आलिशान विवाह सोहळ्याची अट घालण्यात आली होती. वैष्णवी आणि शशांक यांचा एप्रिल २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता, परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. (हेही वाचा : कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू, 6 जखमी)
वैष्णवीच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले की, सासरच्या मंडळींनी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. ती पूर्ण न केल्याने वैष्णवीला मारहाण आणि अपमानास्पद वागणूक दिली गेली. वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वीच बावधन पोलीस ठाण्यात सासरच्या छळाची तक्रार नोंदवली होती, परंतु त्यावेळी राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई झाली नव्हती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. (हेही वाचा : प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या व्हायरल व्हिडिओवर अखेर प्रीती झिंटाने सोडले मौन)
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक
या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १७ मे रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २६ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते. गुरुवारी (२२ मे) राजेंद्र हगवणे तळेगाव येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा रचून दोघांना स्वारगेट परिसरातून अटक केली. (हेही वाचा : पावसाने धर्माची रेषा मिटवली ; पुण्यात मुस्लिम लग्न सोहळ्यात पार पडला हिंदू विवाह)
पोलिसांनी या प्रकरणात हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हाकलपट्टी
या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले, तसेच राजेंद्र हगवणे यांना पक्षातून तात्काळ बडतर्फ केले. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा : केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत भरती)
दुसऱ्या सुनेचे धक्कादायक आरोप
हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हिनेही माध्यमांसमोर येऊन सासरच्या छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, “शशांक, त्याचे आई-वडील आणि नणंद यांनी माझे आणि माझा पती सुशील यांचा छळ केला. सासरे राजेंद्र यांनी माझ्यावरही हात उचलला होता.” मयुरी आणि सुशील यांचाही प्रेमविवाह झाला असून, ती गेल्या दीड वर्षांपासून हगवणे कुटुंबापासून वेगळी राहत आहे. (हेही वाचा : सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक)