Tuesday, July 23, 2024
Homeकृषी"वैरणीसाठी शेवगा लागवड योजना" ;शेतकऱ्यांना मिळणार 'इतके' रुपये अनुदान !

“वैरणीसाठी शेवगा लागवड योजना” ;शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ रुपये अनुदान !

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड  करण्यासाठी अनुदान  देण्यात येणार आहे.

काय आहे योजना?

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुपालकांना वैरणीसाठी ‘शेवगा लागवड करणे’ या योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत. केंद्र शासनाने सन २०२१-२२ या चालू वर्षामध्ये पशुसंवर्धनासाठी राष्ट्रीय पशुधन ( वैरण विकास) अभियान योजनेस मंजुरी दिली आहे. त्यामुळे पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड अनुदान मिळणार आहे.

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

योजनेअंतर्गत मिळणार ‘इतके’ अनुदान

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालन करणाऱ्या व्यक्तीस वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यास प्रति हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. १५ हेक्टर क्षेत्राकरिता ४ लाख ५० हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले असून प्रतिहेक्‍टरी ७.५ किलो शेवगा बियाण्याची किंमत ६ हजार ७५० रुपये इतकी वितरित करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित २३ हजार २५० रुपये अनुदान लाभार्थ्यांना दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीमध्ये भेट घ्यावी. जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू झालेल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित योजनेची माहिती घ्यावी. तसेच, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी आर नरवाडे यांनी केले आहे.

तहानलेले लातूर, पाण्याच्या प्रतीक्षेत आठवड्यातून दोनदा पाणी !

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय