Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणवडवणी : २३ शाळेतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक लॅब

वडवणी : २३ शाळेतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक लॅब

मानव विकास कार्यक्रमांतर्गत वडवणी तालुक्याला मिळाला ३९ लक्ष रुपयांचा भरघोस निधी : वडवणी तालुका पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला आले यश

वडवणी : मानव विकास कार्यक्रम अंतर्गत यापुर्वी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला होता. काम न करता बिले उचललेली आहेत. या तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पत्रकारांच्या तत्परतेने याला आळा बसला आहे. अखेर या योजनेमुळे तालुक्यातील २३ शाळेतील ३ हजार ५०० विद्यार्थ्यांना संगणक लॅब उपलब्ध होणार आहे. वडवणी तालुका पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने पत्रकारांचे कौतुक होत आहे.

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत निविदा काढून वडवणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आशा एकूण २३ शाळांना ३९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांना संगणक लॅब स्थापन करण्यासाठी बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी मंजुरी दिली आहे. आणि तालुक्यातील शाळांना ५ लक्ष रुपयांचे पुस्तक सुद्धा वाटप माघार आहेत. तसेच ११ लक्ष रुपयांचे विज्ञान साहित्य सुद्धा वाटप होणार आहे. यासाठी सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे.

यामुळे वडवणी तालुक्यातील व ग्रामीण भागातील ऊसतोड गरीब होतकरू, कष्टकरी, कामगार यांच्या मुलांना खरा न्याय मिळणार आहे. निधी खेचून आणण्यासाठी वारंवार चिखलबीड जिल्हा परिषद सदस्य, अनिता मुंडे, भाजपा तालुका अध्यक्ष पोपट शेंडगे, रिपाई तालुका अध्यक्ष महादेव उजगरे तसेच वडवणी तालुका पत्रकार संघ यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

या गावांना मिळणार संगणक लॅब

वडवणीच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बाहेगव्हाण, साळींबा, कन्याशाळा वडवणी, पुसरा, हिवरगव्हाण, पिंपरखेड, कवडगाव, खळवट, लिमगाव, हरीचंद्र पिंपरी, चिंचोटी, काडीवडगाव, परडी, लऊळ क्र.२ देवगाव, कोठरबन, सोन्नाखोटा, पिंपळटक्का, पिंपळा, रुई, चिखलबीड, देवळा, खडकी, मोरवड, उपळी या जि.प. च्या शाळांना संगणक लॅब मंजूर झालेले आहेत.

आता भ्रष्टाचार होणार नाही

मानव विकास कार्यक्रमांतर्गत वडवणी तालुक्यात आत्तापर्यंत जो भ्रष्टाचार झाला. कागदोपत्री योजना राबवुन आलेला निधी अधिकारी कर्मचारी संगनमत करुन गिळुन घ्यायचे. मात्र आता तसे होणार नाही. गावागावात नागरिकांनी सतर्क होऊन संगणक, पुस्तक व आलेला निधी खर्च होतो की नाही हे पहायचे आहे. पुन्हा भ्रष्टाचार झाल्यास वडवणी तालुका पत्रकार संघ खपवुन घेणार नाही.

संबंधित लेख

लोकप्रिय