Sunday, March 16, 2025

वडवणी : स्व.जिजाबाई आंधळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेदांतनगर येथे बैठक कट्ट्याचे लोकार्पण

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

वडवणी : प्रत्येक क्षणाला सामाजिक बांधिलकी आणि समाजोन्नतीची जपवणूक करण्याची उत्कट प्रवृत्ती असणारा मनुष्यच उत्तम चारित्र्यातुन व्यापक व्यक्तिमत्व युक्त चरित्र घडवतो हा महापुरुषांचा एक दिव्य अनुभूती संपन्न संदेश अंत:करणामध्ये धारण करून स्व.जिजाबाई दगडूबा आंधळे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान वेदांतनगर याठिकाणी आज बैठक कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले.

स्व.जिजाबाई आंधळे या अतिशय संयमी, शांत आणि सात्त्विक स्वभावाच्या होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार अनुभवले. स्वत:च्या कुटुंबाचा संसार करत असतांनाच त्यांनी संसार आणि अध्यात्माचा उत्कृष्ठ समन्वय साधून कुटुंबातील सर्व सदस्यांना निर्व्यसनी बनवले आणि अध्यात्मातुन प्राप्त होणारी सात्विकता सर्वांना प्रदान केली. स्वत:ची प्रगती करत असतांना कोणत्याही व्यक्तीचा द्वेश करु नका, कोणालाही कदापि कमी लेखू नका असा उपदेश त्या नेहमी कुटुंबातील सदस्यांना करत असत. भौतिक प्रगती ही अल्पायुषी असुन अध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती ही दिर्घायुषी असते. त्यामुळे भौतिकतेला न्युनत्व देऊन सामाजिक आणि अध्यात्मिक प्रगतीला प्राधान्य द्या असे त्या सातत्याने सांगत.

बाल्यावस्थेत त्यांच्या या उपदेशात्मक बाळकडू मुळेच आज आमची अध्यात्मातील मजबुत पकड तयार झाली. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वडवणी– चिखलबीड रोडवरुन येणार्या जाणार्या प्रवाशांना आणि वाटसरुंना आरामात बसुन विसावा घेता यावा यासाठी वेदांतनगरच्या दर्शन फलकाजवळ आक्कांचे चिरंजीव व्यंकटी दगडूबा आंधळे यांनी स्थापन केलेला हा बैठक कट्टा हा स्व.आक्कांनी दिलेल्या अध्यात्मिक सुसंस्काराचीच ही पावती असल्याचे मत स्व.जिजाबाई आंधळे (आक्का)यांचे नातु, श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान वेदांतनगर चे संचालक अध्यक्ष आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री यांनी आक्कांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले.

स्व.जिजाबाई दगडूबा आंधळे (आक्का) यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित बैठक कट्ट्याच्या लोकार्पण सोहळ्यासमयी स्व.जिजाबाई आंधळे यांचे चिरंजीव आणि निळकंठेश्वर संस्थान वेदांतनगरचे सचिव व्यंकटी दगडू आंधळे, संस्थानचे कोषाध्यक्ष अंगदराव विठ्ठलराव मुंडे, युवा उद्योजक धनंजय धायतिडक आणि श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान वेदांतनगर चे सर्वेसर्वा आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री आदि. उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles