Thursday, April 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशहरातील गोवंशीय जनावरांचे युद्धपातळीवर लसीकरण – आयुक्त शेखर सिंह

शहरातील गोवंशीय जनावरांचे युद्धपातळीवर लसीकरण – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरात ३ हजार पाचशे गोवंशीय जनावरे आहेत, त्यातील ५ जनावरांना लंपी विषाणू बाधा झाली आहे. त्यामुळे शहरातील पशुपालकांमध्ये प्रबोधन करून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी पालिकेच्या आढावा बैठकीत दिली आहे.

शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पशुवैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करावीत, असे आदेशही आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

उपायुक्त सचिन ढोले, अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे आदी बैठकीस उपस्थित होते. लंपी विषाणू संदर्भात चुकीची माहिती प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त सचिन ढोले यांनी दिला आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय