Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 131 मध्ये एका धक्कादायक घटनेत पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर सासूने भररस्त्यात आपल्या सूनेला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत पीडित महिलेला काठीने मारहाण केली जात असून तिचे केस देखील ओढले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासूने देखील संधी साधत सूनेला काठीने मारहाण केली.तर आणखी एक महिला पीडितेचे केस घेचत आहे या घटनेत एकानेही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही, शेजारी फक्त बघ्याची भूमिका घेत होते.
या प्रकारानंतर पती घटनास्थळावरून पळून गेला, आणि त्याच्यासह तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या घटनेचा अधिक तपास करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Uttar Pradesh
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती