मुंबई : देशभरात आज (१२ एप्रिल २०२५) युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा वापरताना अचानक अडचणींचा सामना करावा लागला. UPI Down झाल्याने लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप्स असलेल्या Google Pay (GPay), PhonePe आणि Paytm यांच्या सेवांमध्ये अचानक खंड पडला असून, लाखो वापरकर्त्यांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी सकाळी UPI सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाला, यामुळे पेमेंट आणि निधी हस्तांतरणाच्या अनेक व्यवहारांना ब्रेक लागला आहे. Downdetector या डिसरप्शन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर सकाळी ११:३० वाजता तब्बल १,२०० पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये ७६ टक्के तक्रारी पेमेंटच्या अयशस्वी होण्याशी संबंधित असून, २३ टक्के निधी हस्तांतरणाच्या समस्यांशी आणि उर्वरित ४ टक्के अॅपच्या कार्यप्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. या खंडित सेवेमुळे वापरकर्त्यांना किराणा दुकानांपासून ते मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवहारांमध्ये अडथळे येत आहेत. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)
GPay, PhonePe आणि Paytm या प्रमुख पेमेंट अॅप्ससह HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि कोटक महिंद्रा बँक यांसारख्या बँकांच्या UPI-लिंक्ड सेवांमध्येही अडचणी उघडकीस आल्या आहेत. यापूर्वी २६ मार्च आणि २ एप्रिल रोजीही UPI सेवांमध्ये अशा प्रकारचे खंड पडले होते, त्यामुळे हे तिसरे प्रकरण असल्याने डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (हेही वाचा – खासदारानं संसदेत सलग २५ तास भाषण देऊन केला विक्रमी, म्हणाला आपला देश संकटात आहे…)
वापरकर्त्यांचा संताप आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया | UPI Down
सोशल मीडियावर #UPIDown हॅशटॅगसह वापरकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “UPI पुन्हा डाऊन झाले आहे, सर्व पेमेंट अयशस्वी होत आहेत. किमान नियोजित खंडाबाबत आधी सूचना द्यावी,” तर दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले, “माझ्याकडे रोख रक्कम नव्हती आणि UPI डाउनमुळे मी ऑटोवाल्याला भाडे देण्यास असमर्थ होतो.” काहींनी “रोख रक्कम सोबत ठेवा” अशा सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा – मोठी भरती : पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार)
UPI ही भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टीमची रीढ बनली असून, दररोज कोट्यवधी व्यवहार या माध्यमातून होतात. मात्र, अशा सलग खंडांमुळे वापरकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)