Sunday, December 8, 2024
Homeराष्ट्रीयपोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटला, फोनवर उत्तर पत्रिका, विद्यार्थ्यांमध्ये संताप

पोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटला, फोनवर उत्तर पत्रिका, विद्यार्थ्यांमध्ये संताप

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटला आहे. मैनपुरी येथे रविवारी पोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटला असल्याची माहिती आहे. या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप असून विद्यार्थ्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

मैनपुरी शहरातील डॉ. किरण सौजिया अकादमीच्या ब्लॉक बी मध्ये केंद्र प्रशासकाने एका उमेदवाराला सोडवलेल्या प्रतीसह पकडले. त्याच्याकडे दोन पेपर सापडले, ज्यामध्ये परीक्षेतील 150 पैकी 114 प्रश्नांची उत्तरे क्रमाने लिहिली होती. याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. उमेदवाराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी केंद्र प्रशासकाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रशासनात खळबळ उडाली

पोलीस भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उमेदवारांकडे आधीच उपलब्ध असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतेही औपचारिक निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवाराची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी रविप्रकाश यांचा मोबाईलही जप्त केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षेचा पेपर लीक झालेल्या नंतर सोशल मीडियावर पेपर लीक संदर्भात ट्रेन्ड सुरू आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय