Monday, December 9, 2024
Homeआरोग्यकोरोनायुपी बेहाल, रुग्ण घरूनच आणत आहेत खाटा

युपी बेहाल, रुग्ण घरूनच आणत आहेत खाटा

उत्तर प्रदेश : मेरठमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे. मेरठमधील करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ९४१ वर पोहचली आहे. त्यामुळेच येथील सर्वात मोठं सरकारी करोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत. या केंद्रामधील पंखे काम करत नाहीयत, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचं चित्र दिसत आहे.

दिल्लीमधील विद्यापिठामध्ये शिकणाऱ्या वशिष्ट शर्मा नावाच्या तरुण मुलाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रामध्ये दाखल असणाऱ्या त्याच्या वडिलांसाठी कुटुंबियांनी स्वत: फोल्ड होणारी खाट केंद्रांत आणली. वॉर्डातील कॉरीडोअरमध्ये ठेवण्यात आलेल्या खाटेवर या मुलाचे वडील उपचार घेत आहेत. “आम्ही आमची खाट आणली हे एका अर्थाने चांगलं आहे. येथील परिस्थिती इतकी वाईट आहे की रुग्ण चादरी टाकून किंवा थेट जमीनीवरच झोपून उपचार घेत आहेत,” असं शर्मा सांगतो. “माझ्या वडीलांना २८ एप्रिल रोजी येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाचा त्रास असला तरी छातीसंदर्भातील इतर त्रासही त्यांना जाणवत आहे. येथे रुग्णसंख्या अधिक असल्याने डॉक्टर माझ्या वडिलांसाठी वेळ देत नाहीत,” असं शर्मा याने सांगितलं.

मेरठमधील या कोवीड सेंटरमध्ये सरकारी बेड्सच्या मधल्या जागेमध्ये लोकांनी स्वत: आणलेल्या खाटा ठेवलेल्या आहेत. या केंद्रात करोना नियमांचं पालन होतानाही दिसत नाही. रुग्णांच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक बसून असतात. रुग्णांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने नातेवाईकांना परवानगी देण्यात आल्याचं समजतं. या ठिकाणी मोकळी हवाही नाहीय. येथील एक ३४ वर्षीय रुग्ण चक्क एक्स रे रिपोर्टच्या सहाय्याने स्वत:ला हवा घालतानाही दिसला.

संबंधित लेख

लोकप्रिय