दिघी : दिघीगाव कोरोना मुक्त समिती नामाकंन ‘टि शर्ट’चे अनावरण दिघीगाव कोरोना मुक्त समिती चे जेष्ठ मार्गदर्शक, सल्लागार अशोक काशिद यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचक्रोशीच नव्हे तर .., संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच दिघी प्रभाग कोरोना मुक्तीसाठी राबवत आसलेला पॅटर्न म्हणजेच दिघीगाव कोरोना मुक्त समिती होय.
दिघीतून कोरोना कायमचा हद्दपार व्हावा या ध्यर्याने पद, प्रतिष्ठा, राजकीय हेवे दावे विसरुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिघीतील तरुण एकत्रित येत प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, गरजू, गरिब, सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी दडपड करणाऱ्या समिती सदस्य योध्दानां टि शर्टचे वाटप करत अनावरण करण्यात आले.