Tuesday, September 17, 2024
Homeजुन्नरजुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरला रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवजन्मभूमी विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध

जुन्नर / आनंद कांबळे : ऐतिहासिक पार्श्वभूमी  लाभलेल्या जुन्नर (Junnar) तालुक्याला निसर्ग पर्यटनालाही अनुकूल वातावरण आहे. इथे येणाऱ्या पर्यटकाला सर्व सुविधा देऊन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येईल.  शहरात स्वच्छता राहावी यासाठी जुन्नरच्या भुयारी गटर योजनेसाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिवजन्मभूमी परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit Pawar) यांनी दिली. 

जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष शाम पांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, आशाताई बुचके, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी उपस्थित होते. 

जुन्नर परिसरात बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

4 थी पास ते पदवीधरांसाठी संधी ! जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

पवार म्हणाले, जुन्नरमध्ये गेल्या दोन वर्षात ४९४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन, भूमिपूजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन विकासाच्या कामात राजकारण न करता जनहिताची कामे करण्याची भूमिका शासनाने स्वीकारली आहे. शिवनेरी परिसराचा कायापालट, रायगडचा विकास करताना त्याचे मूळ स्वरुप कायम ठेऊन विकास करण्यात येत आहे. त्यासोबत नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी राज्य संग्रहालयाच्या निर्मितीसाठी सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पात पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अष्टविनायक परिसर विकासासह विविध रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. अष्टविनायक परिसर विकासासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद कमी पडल्यास अधिक निधी देऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीदेखील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

12 वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस

छत्रपती शिवाजी महाराज या नावाने राज्यातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. महाराजांचे नाव घेताच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जायचे आहे. अशा युगपुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपल्या भूमीचे भाग्य आहे. महाराजांनी दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणाचे कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, शेतकऱ्यांचे कैवारी होते, कलावंतांचे आश्रयदाते होते.  त्यांनी गोरगरीबांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना होते. आज समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत असताना महाराजांचा आदर्श समोर ठेऊन एकोप्याने राहाण्याची गरज आहे.  जुन्नरला महाराजांचे स्मारक उभारल्याने येणाऱ्या पर्यटकासमोर त्यांचा आदर्श ठेवता येईल. जुन्नरच्या विकासकामांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

आमदार बेनके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जातांना सुराज्याचा आदर्श जगासमोर उभा केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासक महाराष्ट्रात येतात. त्यांचा पुतळा जुन्नरमध्ये उभा होत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे. 

जुन्नरमध्ये शासकीय विश्रामगृहाचे एक उत्कृष्ट महसूल निर्माण करणारे मॉडेल करण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये वस्तुसंग्रहालय, नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा रोप वे उभारण्याचाही डीपीआर तयार केला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी दीड कोटी रुपये डीपीआर साठी देण्याचे निर्देश दिले असल्याचेही बेनके यांनी सांगितले. 

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 264 जागांसाठी भरती

जुन्नरच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा नगर परिषदेतर्फे उभारण्यात आल्याचे नगराध्यक्ष पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. पर्यटनाच्या माध्यमातून शहराचा विकास वेगाने होत असल्याचे ते म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार निलेश खेडकर यांचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह, शिवसृष्टी, वस्तू संग्रहालय, नाट्यगृह, रस्ते, पाणी पुरवठा पाईपलाईन, साकव आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय