Union budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर केला. एनडीए सरकारच्या नेतृत्वाखालील हे पहिले बजेट असल्याने संपूर्ण देशाचे तसेच घटक पक्षांचे लक्ष या बजेटकडे लागले होते. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या तरतुदींसह, मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि युवकांसाठी नवीन योजना यांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प आहे.
वेतनधारकांसाठी कर सवलत (Union budget)
– 0-3 लाखांपर्यंत उत्पन्न – शून्य टक्के कर
– 3-7 लाखांपर्यंत उत्पन्न – 5 टक्के कर
– 7-10 लाखांपर्यंत उत्पन्न – 10 टक्के कर
– 10-12 लाखांपर्यंत उत्पन्न – 15 टक्के कर
– 12-15 लाखांपर्यंत उत्पन्न – 20 टक्के कर
– 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न – 30 टक्के कर
युवकांसाठी नवीन योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युवकांसाठी नवीन इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. यामध्ये ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार असून, या काळात त्यांना दरमहा ५००० रुपये मानधन दिले जाणार आहे.
उच्च शिक्षणासाठी कर्ज
उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार आहे.
स्वस्त होणारे वस्तू आणि सेवा
कॅन्सरची औषधे, एक्स-रे मशीन, लिथियम बॅटरी, मोबाईल, चार्जर, सौर उर्जेची उपकरणे आणि विजेच्या तारा स्वस्त होणार आहेत. तसेच सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केल्यामुळे त्यांचे दरही कमी होणार आहेत.
बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद
बिहारसाठी २६ हजार कोटी रुपये आणि आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी १५,००० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास आणि घरकुल योजना
– पीएम आवास योजनेतून ३ कोटी घरांची घोषणा
– ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटी रुपयांचा निधी
– महिला आणि युवतींसाठी ३ लाख कोटी रुपयांचा निधी
कृषी विकास
शेतकऱ्यांसाठी २१ टक्के जास्त निधी म्हणजे २५ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हवामानामुळे शेती उत्पन्नावर होणाऱ्या परिणामासाठी विशेष प्रावधान करण्यात आले आहे. तथापि, किसान सन्मान निधीची रक्कम ६००० रुपयेच राहणार आहे.
ऊर्जा सुरक्षा
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत १ कोटी घरांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. छतावर सौर संयंत्रे बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे.
अन्य महत्त्वपूर्ण घोषणा
– मुद्रा कर्ज मर्यादा वाढवून २० लाख रुपये
– १२ औद्योगिक उद्यानांना मंजुरी
– शहरी गृहनिर्माण योजनेसाठी १० लाख कोटी रुपये
– रस्ते विकासासाठी २६ हजार कोटी रुपये
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 हा विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदींसह आणि नवीन योजनांसह सादर करण्यात आला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद केल्यामुळे या राज्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
हेही वाचा :
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर
नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा
आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी
Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी
जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद
मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार