Tuesday, December 3, 2024
Homeराष्ट्रीयBudget : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

Budget : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

मुंबई : अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगदी काही वेळ आधी शेअर बाजाराने घसरण नोंदवली आहे. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. (Union budget – 2024)

मुंबई शेअर शेअर मार्केट निर्देशांक सेन्सेक्स सुमारे १२०० अंकांनी घसरून ७९२२४.३२ अंकांवर आला. तथापि, सेन्सेक्स ८०७८४. ३० अंकांवर उघडला होता. दुसरीकडे, निफ्टीमध्येही सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. निफ्टी २३२.६५ अंकांच्या घसरणीसह २४२७६.३ अंकांवर व्यवहार करताना दिसला. (Union budget – 2024)

मुंबई शेअर बाजारातील देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरचा भाव २९२७.१० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, L&T च्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

ओएनजीसी आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. हिंदाल्को आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये २.५ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे. सकाळी ११ वाजता निफ्टीने पुन्हा सावरत १०.३५ अंकांची उसळी घेत २४,५१९.६० अंकांवर झेप घेतली आहे. (Union budget – 2024)

अर्थ तज्ञांच्या मते मोदी सरकारबद्दल पहिल्या दोन टर्म मध्ये शेअर मार्केट मध्ये प्रचंड आत्मविश्र्वास होता, मात्र तिसऱ्या टर्म मध्ये सरकार कडे पूर्ण बहुमत नसल्यामुळे आर्थिक आघाडीवर सरकारला तडजोडी कराव्या लागतील त्यामुळे शेअर मार्केट सावधान, मंदगतीने वाटचाल करत आहे.

budget

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय