Bluetooth Blast explosion : उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे नेकबँड ब्लूटूथच्या स्फोटामुळे एका १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशीष असे या तरुणाचे नाव असून, तो घराच्या छतावर मोबाईल वापरत असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास आशीष नेकबँड ब्लूटूथच्या साहाय्याने कोणासोबत तरी बोलत होता. त्याच वेळी अचानक नेकबँडचा स्फोट झाला. या स्फोटाचा मोठा आवाज ऐकून कुटुंबीय छतावर धावले असता, आशीष जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या खुणा होत्या. गळ्यातील ब्लूटूथ वितळत खाली लटकत होता.
Bluetooth Blast मुळे परिसरात भीतीचे वातावरण
कुटुंबीयांनी तातडीने आशीषला राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
सदर तरुणाने वापरलेला ब्लूटूथ नेकबँड कोणत्या कंपनीचा होता? त्याने सर्व सुरक्षा निकष पूर्ण केले होते का? याबाबत तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर नेकबँड ब्लूटूथच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा :
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या