Tuesday, October 8, 2024
Homeताज्या बातम्याNashik : नाशिकमध्ये 'एसएफआय'चा आदिवासी विकास आयुक्तालयावर उलगुलान मोर्चा

Nashik : नाशिकमध्ये ‘एसएफआय’चा आदिवासी विकास आयुक्तालयावर उलगुलान मोर्चा

नाशिक (ता. २९) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने नाशिक (Nashik) येथील आदिवासी विकास आयुक्तालयावर वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी उलगुलान मोर्चा काढण्यात आला. गोल्फ क्लब मैदानावरून दुपारी १ वाजता सुरू झालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकला

एसएफआयच्या या आंदोलनातून विविध मागण्या मांडण्यात आल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश द्या, सेंट्रल किचन पद्धती बंद करणे, आणि वसतिगृहातील जेवणाची पूर्वीप्रमाणे मेस पद्धती सुरू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, आश्रमशाळांमधील मुलभूत सुविधांचे प्रश्न सोडवणे, वसतिगृहांसाठी सरकारी इमारती उभारणे, आणि विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक प्रवेश देणे यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या देखील समाविष्ट होत्या. (Nashik)

या आंदोलनाला एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले. यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चा केली. परंतु, सव्वा दोन तासांच्या बैठकीनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एसएफआयने जाहीर केले आहे.

मोर्चात एसएफआयचे राज्य कमिटी सदस्य, विद्यार्थी, आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

संबंधित लेख

लोकप्रिय