कीव : गेल्या 22 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करत आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील 103 मुलांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक मुले जखमी झाली आहेत.
दूधाचे दर वाढले, शेतकऱ्यांना फायदा होणार !
या हल्ल्यांमध्ये शेकडो निष्पाप लोकांनाही मृत्यू आला आहे. युक्रेन ने रशियाच्या चौदा हजार सैनिकांना मारले असल्याचे सांगितले जात आहे. याच बरोबर रशियाची 86 विमाने, 108 हेलिकॉप्टर आणि 444 रणगाडे उध्वस्त केले आहेत. याची माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून रशियाचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे याबाबतची माहिती दिली आहे.
Information on Russian invasion
Losses of the Russian armed forces in Ukraine, March 17 pic.twitter.com/A0i5UkCznd
— MFA of Ukraine ?? (@MFA_Ukraine) March 17, 2022
रशियाकडून युक्रेनच्या अनेक भागांमध्ये आणि शहरांमध्ये स्पोट आणि गोळीबार सुरूच आहे. रशियन सैन्याने आतापर्यंत यांचे बरेच मोठे नुकसान केले असून छोटासा वाटणारा युक्रेन रशियाच्या वाटेतील प्रमुख अडथळा ठरत आहे. शांतता करार प्रस्थापित व्हावा यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही देशांकडे लागले आहे.