Saturday, January 28, 2023
HomeNewsउद्धव मोरे यांची 'कसम' च्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड .

उद्धव मोरे यांची ‘कसम’ च्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड .

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्यात बांधणी.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: असंघटित कामगारांसाठी लढाऊ, व आक्रमकपणे कार्य करणारी संघटना कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी उद्धव धोंडीराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे .

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र ही बांधकाम कामगार,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार,रिक्षा चालक,फेरीवाला यांच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असून पस्तीस हजार सभासद संख्या असलेल्या या संघटनेच्या औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्षपदी मोरे यांची निवड करण्यात आली आहे. मोरे यांच्या बांधकाम कामगार, सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल कष्टकरी संघर्ष महासंघाच्या निवड समितीने घेतलेली असून महासंघाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे . पत्रात म्हटले आहे की आपल्यावरील दिलेली जबाबदारी व संघटना वाढीचे उद्दिष्ट आपण पूर्ण कराल तसेच सर्वसामान्य बांधकाम कामगार , व इतर सर्व कामगार यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून संघटना वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहाल. आपण संघटनेचे ध्येय धोरणे व शिस्तीचे पालन करून संघटना बळकटीसाठी एकनिष्ठ राहून कार्य करावे.

निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करून कामगार नेते काशिनाथ नखाते, समाज मध्यम प्रमुख उमेश डोर्ले यांनी पत्र देऊन भावी कार्यासाठी मोरे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय