Friday, March 29, 2024
Homeग्रामीणकरवंदे येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात विज पडून दोन बैल ठार ;...

करवंदे येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात विज पडून दोन बैल ठार ; दुसरा मोठा अनर्थ टळला !

फोटो – सुरगाणा तालुक्यातील करवंदे येथे विज पडून ठार झालेल्या
बैला समवेत शेतकरी चिंतामण चव्हाण

सुरगाणा ता.५ (दौलत चौधरी) : आज ता.५ रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात करवंदे येथे विज पडून चिंतामण चिमण चव्हाण या शेतकऱ्याचे दोन बैल शेतातच ठार झाले तर एका बैलाला विजेचा जोरदार शाॅक बसला आहे. सदर घटनेची नैसर्गिक आपत्ती विभागाने तात्काळ दखल घेत तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून माहिती घेतली. तसेच सदर घटना जिल्हाधिकारी नैसर्गिक आपत्ती विभागास कळविण्यात आली आहे. 

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण आठरे यांनी पशुचिकित्सक श्रीकांत पवार, भावेश देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पाहणी केली असता जनावरांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. जनावरे ताठ पडलेल्या अवस्थेत पोट फुगून आले होते. याबाबत शांताराम पालवे यांनी सांगितले की, गावापासून जवळच खडक उतारा टाकलीच्या शेतात चार ते पाच शेतकरी बैल चारत होते. 

विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत गावित, सोनिराम चव्हाण,  प्रकाश सहारे, बैल मालक चिंतामण चव्हाणांचा नातू  चेतन चव्हाण यांनी लगतच्या एका झापाचा आसरा घेतला. काही क्षणातच लख्ख प्रकाश पडताच कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला. नेमके काय झाले हे कळेनासे झाले. मात्र चेतनने झापाच्या भिंतीच्या छिद्रातून घटना प्रत्यक्षात बघितली. विज सरळ रेषेत पडल्याने दोन ते तीन बैलावर पडली. तिरप्या दिशेने पडली असती तर सात ते आठ बैल व चार शेतकरी यांच्या जिवावर बेतले असते. तलाठी प्रकाश कडाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले असून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस पाटील भागवत सहारे, भिका चव्हाण, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय