Sunday, June 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना, 70 जण बेपत्ता

---Advertisement---

---Advertisement---

जोरहाट : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सुमारे 120 प्रवासी असणाऱ्या दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना झाली आहे. यातील एक बोट माजुलीहून नेमातीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. यात 70 हुन अधिक जण बेपत्ता झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील नेमातीघाटाजवळ ही घटना घडली आहे. 

जाणून घ्या ! केळी खाण्याचे फायदे व तोटे

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या दुःखद घटनेवर दुःख व्यक्त केले आणि त्यांनी गुरुवारी नेमातीघाटला भेट देणार असल्याचे सांगितले. “नेमाती घाट, जोरहाट जवळ झालेल्या दुःखद बोट अपघातामुळे मी दु: खी आहे. माजुली आणि जोरहाट प्रशासकांना NDRFHQ आणि SDRF च्या मदतीने त्वरित बचाव मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. मी उद्या घटनास्थळी भेट देईन.” असे त्यांनी ट्विट केले.

हे वाचा ! एसटीच्या ताफ्यात 2 हजार इलेक्ट्रिक बस

आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे आणि 70 जण अद्याप बेपत्ता आहेत, असे एनडीआरएफचे उप कमांडंट पी श्रीवास्तव यांनी सांगितले. तर, जोरहाटमधील नेमातीघाट येथे बोट अपघातात एकाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बचावकार्य अद्यापही सुरू असल्याचे असे जोरहाटचे एसपी अंकुर जैन यांनी सांगितले आहे.

वाचा सविस्तर ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles