Saturday, February 15, 2025

“तुळस ही बहुजन कष्टकरी वर्गाच्या वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे” यशवंत कांबळे

“आप” ने काळा खडक येथे तुळशी रोपांचे वाटप केले

पिंपरीचिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर

काळा खडक येथे ‘आप’ चे कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांच्या वतीने तुळशी विवाहाच्या निमित्ताने माता भगिनींना तुळशीची रोपे वाटण्यात आली.

तुळस हे मांगल्याचे प्रतीक आहे,वैज्ञानिक दृष्टीकोनातून वड,पिंपळ प्रमाणे तुळस लागवडीमुळे प्राणवायूचा समतोल राखते.वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्व सांगतो,शहरातील नागरिकांनी घरामध्ये विदेशी रोपे न लावता तुळशीचे वृंदावन राखावे असे यशवंत कांबळे यांनी सांगितले.

यावेळी राज भाई चाकने,यशवंत कांबळे,ब्रम्हानंद जाधव,संतोषी नायर,अजय सिंह,गोविंद माळी,स्वप्नील जेवळे,प्रविण शिंदे,सीमा यादव,ओमीन गायकवाड,सर्फराज मुल्ला,सुरेश भिसे,देवेंद्र सिंग यादव,अजिनाथ सकट,जावळे मामा,राजेश सपारे,रोहित सरनोबत,जावळे मामी,आशुतोष शेळके आदी उपस्थित होते.

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles