Tuljapur : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील एक नवविवाहिता नळदुर्गच्या किल्ल्यातील बुरुजावर सेल्फी घेत असताना सुटलेल्या वाऱ्यात तोल जाऊन सुमारे शंभर फुटावरून खाली कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे. (Tuljapur)
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील अमीर महेबूब शेख यांच्याशी तुळजापूर तालुक्यातील राकेल या गावातील त्यांच्या मामाची मुलगी निलोफर (२२) हिचा २० मे रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर हे नवदाम्पत्य सोबतीला भाचा इरफान कासीम शेख, मित्र सचिन भगवान सिरसाठ हे नळदुर्ग येथील किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजता किल्ल्यातील उपल्या बुरूजावर हे सर्वजण फोटोसेशन करीत होते. निलोफर याही फोटो काढून घेत होत्या. बुरुजावरील वायव्य टोकाला थांबून त्या फोटो घेत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे निलोफर यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निलोफर यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे स्पष्ट झाले.
लग्नाच्या आठव्याच दिवशी गाठले मृत्यूने…
मयत निलोफर यांचे २० मे रोजी लग्न झाले होते. विवाहाला आठही दिवस पूर्ण झाले नाही तोच मृत्यूने त्यांना गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या बुरुजावरून त्या खाली पडल्या, तो उपल्या बुरुज सुमारे १०० फूट उंचीचा आहे. वर जाण्यासाठी ७७ पायऱ्या चढाव्या लागतात. अकस्मात आलेल्या वाऱ्याने निलोफरचा घात झाला.
कुटुंबामध्ये हळहळ
लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि फिरण्यानिमित्त बाहेर गेले होते त्यातच वाऱ्याने घात केला विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले असून नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी आक्रोश करत आपला शोक व्यक्त केला.
हेही वाचा :
ब्रेकिंग : उड्डानापुर्वीच विमानात बॉम्ब असल्याची माहिती, प्रवाशांमध्ये घबराट, खिडकीतून काढले बाहेर
विविध मागण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे जुन्नर तहसिल कार्यालयावर आंदोलन
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी