Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करा; सिटूची आमदारांकडे निवेदनद्वारे मागणी.

---Advertisement---

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करण्यात आणि कोविड काळात आपल्या निधीतून आशांना किमान १० हजार रुपयाचे मदत निधी द्यावी, अशी मागणी सिटूच्या वतीने हिंगणा विधानसभेचे आमदार समिर मेघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

---Advertisement---

निवेदनात म्हटले आहे की, हिंगणा विधानसभा क्षेत्रात आशा वर्कर्स आपल्या पाठीशी होत्या व आता सुद्धा आहेत. आशा वर्कर्सबद्दल याआधी आपण चांगली कामगिरी बजावली आहे. 

त्याची पावती आशा वर्कर्सने निवडणूक काळात देऊन परत आमदार पदावर आरुढ केले. सध्या कोरोना काळात अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशाना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

कैविडच्या काळात आपल्या आमदार निधीतून आशांना किमान १० हजार रुपये मदत निधी करण्याची मागणी सिटूच्या करण्यात आली आहे. यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे, सचिव प्रिती मेश्राम आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles